नवी दिल्ली - नवज्योत सिंग सिद्धू यांनी राजीनामा मंजूर झाल्यानंतर आज आपला चंडीगडमधील सरकारी बंगला सोडला आहे. 'मंत्रीमडळाचा बंगला रिक्त केला असून तो पंजाब सरकारकडे सोपवला आहे', असे टि्वट सिद्धू यांनी केले आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपला सरकारी बंगला सोडला - bungalow
नवज्योत सिंग सिद्धू यांनी राजीनामा मंजूर झाल्यानंतर आज आपला चंडीगडमधील सरकारी बंगला सोडला आहे
नवज्योत सिंग सिद्धू यांचा राजीनामा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंजूर केला आहे. सिद्धू यांनी स्वतःच्या ट्विटरवरुन १० जूनला राजीनाम्याचे पत्र शेअर केले होते.
सिद्धू यांचे खाते बदलून त्यांना ऊर्जा आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा मंत्रालयाचे खाते देण्यात आले होते. खाते बदलल्यामुळे सिद्धू नाराज असल्याची माहिती होती. याचबरोबर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी बऱ्याच काळापासून चाललेल्या वादानंतर त्यांनी हे पाऊल उचलले असल्याची चर्चा होती. मात्र अमरिंदर सिंग यांनी सिद्धू यांच्यासोबत कोणत्याही समस्या नसल्याचे सांगितले.