महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंजाब विषारी दारु प्रकरण: अवैध दारूचा व्यापार थांबविण्यासाठी पंजाब सरकारने प्रयत्न करावेत - मायावती

पंजाबमध्ये शंभरपेक्षा जास्त लोकांचा विषारी दारू प्यायल्यामुळे मृत्यू झाला हे दुःखदायक आहे. राज्यातील काँग्रेस सरकारने अवैध दारूविक्री आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी. अन्यथा अनेक लोकांना विषारी दारूमुळे जीव गमवावा लागेल, असे मायावती यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले.

Mayawati
मायावती

By

Published : Aug 3, 2020, 2:35 PM IST

लखनऊ -पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने 104 जणांचा मृत्यू झाला आहे. बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी पंजाब सरकारकडे राज्यातील अवैध दारूचा व्यापार रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. विषारी दारू प्रकरणात मृत्यू झालेल्या व्यक्तींबद्दल मायावती यांनी शोक व्यक्त केला.

पंजाबमध्ये शंभरपेक्षा जास्त लोकांचा विषारी दारू प्यायल्यामुळे मृत्यू झाला हे दुःखदायक आहे. राज्यातील काँग्रेस सरकारने अवैध दारूविक्री आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी. अन्यथा अनेक लोकांना विषारी दारूमुळे जीव गमवावा लागेल, असे मायावती यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले.

पंजाब सरकारने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. शनिवारी सरकारने या प्रकरणाची दंडाधिकारी स्तरावरील चौकशी करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी 7 उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी, 6 पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.

आम आदमी पक्षाने राज्यात ठिकठिकाणी पंजाब सरकार विरोधात निदर्शने केली. विषारी दारू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्यावी, अशी मागणीदेखील आपने केली. भाजपाने पंजाब सरकारवर जोरदार टीका केली. पोलीस आणि अवैध दारूविक्री करणाऱ्या माफीया यांचे संबंध असल्याचे आरोप भाजपाने केला आहे.

पंजाब पोलिसांनी याप्रकरणी शंभर ठिकाणी छापे टाकत 25 आरोपींना अटक केली आहे, असे सांगितले. मृतांमध्ये सर्वाधिक 75 जण हे तरणतारण येथील आहेत. अमृतसर ग्रामीणमध्ये 12 जणांचा तर गुरुदासपूर मधील 11 जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details