महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंजाब सरकारने 800 हून अधिक परदेशी नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी पोहोचवले - Standing Operating Procedures

सरकारी कार्यप्रणालीनुसार, या सर्वांची आरोग्य तपासणी केली. त्यांच्यामध्ये कोविड-19 ची लक्षणे नाहीत ना, याची तपासणी झाली. कोरोना संसर्गाची लक्षणे नसलेल्यांनाच परत जाण्याची परवानगी दिली. कोरोनाबाधित आणि तशी लक्षणे असलेल्यांवर कार्यप्रणालीतील आरोग्य मानकांनुसार, पुढील उपचार होतील.

पंजाब सरकार
पंजाब सरकार

By

Published : Apr 12, 2020, 11:40 AM IST

नवी दिल्ली - भारतात अडकलेल्या जवळपास 825 परदेशी नागरिकांना पंजाब सरकारने त्यांच्या मायदेशी पाठवले आहे. केंद्र सरकारच्या मानक कार्यप्रणालीनुसार (एसओपी) त्यांना पाठवण्यात आले आहे. त्या त्या देशांचे एनआरआय आणि इतर नागरिकांचा यात समावेश आहे. 31 मार्चपासून 9 एप्रिल 2020 पर्यंतच्या विशेष विमानांद्वारे या सर्वांना मायदेशी पाठवण्याची व्यवस्था परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.

परदेशी नागरिकांना परत पाठवण्याविषयी प्रक्रियेसंबंधी केंद्रीय गृहसचिवांनी राष्ट्रीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष म्हणून सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. काही राष्ट्रांनी या संदर्भात केंद्र सरकारशी संपर्क साधून आपल्या नागरिकांना मायदेशी धाडण्याची विनंती केली होती. याला प्रतिसाद देताना या प्रत्येक परदेशी नागरिकांची स्वतंत्रपणे माहिती घेऊन त्यांच्याबाबत ही प्रक्रिया राबवण्यात आली.

या परदेशी नागरिकांमध्ये फिनलंडच्या 28, डेन्मार्कच्या 86, स्वीडनच्या 43, नॉर्वेच्या 50, लात्वियाच्या 14, जपानच्या 6 नागरिकांचा समावेश आहे. तसेच, रशिया, स्लोव्हेनिया, चेक रिपब्लिकच्या प्रत्येकी दोन आणि उझबेकिस्तान, बेलारूसच्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. याशिवाय कॅनडाच्या 170 आणि अमेरिकेच्या 273 नागरिकांनाही मायदेशी परत पाठवण्यात आले. येत्या काळात ब्रिटिश नागरिकांना परत पाठवण्यात येत आहे. यासाठी ब्रिटिश सरकारकडून अमृतसर आणि चंदीगडहून सुटणाऱ्या विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे.

याशिवाय, दक्षिण कोरियाच्या 15, मलेशियाच्या 33, स्पेनच्या 17, स्वित्झर्लंडच्या 7, तैवान आणि मेक्सिकोच्या प्रत्येकी 4, नेदरलँडसच्या 9, सिंगापूरच्या 57 नागरिकांना सुरक्षितपणे परत मायेदेशी पाठवण्यात आले आहे.

सरकारी कार्यप्रणालीनुसार, या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच, त्यांच्यामध्ये कोविड-19 ची लक्षणे नाहीत ना, याची तपासणी झाली. कोरोना संसर्गाची लक्षणे नसलेल्यांनाच परत जाण्याची परवानगी देण्यात आली. तर, कोरोनाबाधित आणि तशी लक्षणे असलेल्यांवर कार्यप्रणालीतील आरोग्य मानकांनुसार, पुढील उपचार करण्यात येणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details