चंदीगड- पंजाबमध्ये आता दारू महाग होणार आहे, कारण राज्यसरकारने दारूवर 'कोविड सेस' लागू केला आहे. सरकारने दारू विक्रीवर जादा एक्साईज ड्यूटी आणि जादाची असेस्ड फी लावण्याचा निर्णय घेतला आहे. दारूच्या प्रकारावर हा दर २ रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत असणार आहे.
यामुळे राज्य सरकारला १४५ कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे, ज्याचा या महामारीशी लढण्यासाठी उपयोग होणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यसरकारचे भरपूर नुकसान झाले आहे. ते भरून काढण्याच्या दृष्टीने एक जूनपासून राज्यात हा कोविड कर लागू करण्यात येणार आहे, असे पंजाब सरकारने स्पष्ट केले.