चंदीगड -जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. 10 हजारांपेक्षा जास्त रुग्ण भारतात आढळून आले आहेत. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि सफाई कर्मचारी कोरोना विरोधातील लढाई लढत आहेत. मात्र, या पहिल्या फळीतील सुपर हिरोंनाच कोरोनाचा संसर्ग होत आहे. दिल्लीत 3 पोलिसांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंजाब सरकार पोलिसांनाही देणार आरोग्य कर्मचाऱ्यांसारखे प्रोटेक्टिव्ह ड्रेस - panjab police security
पोलिसांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पंजाब सरकारने पोलिसांना डॉक्टरांसारखे प्रोटेक्टिव्ह ड्रेस देण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलिसांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पंजाब सरकारने पोलिसांना डॉक्टरांसारखे प्रोटेक्टिव्ह ड्रेस देण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावर, नाक्यावर उभ्या असलेल्या पोलिसांना आता पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट मिळणार आहे. कोरोनाचा सामना करताना पोलीस आघाडीवर आहेत, त्यांच्या सुरक्षेचा विचार करत सरकारने हा निर्णय घेतला आहे.
पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंटमध्ये फूल एप्रन, मास्क, ग्लोव्ज यांचा समावेश असतो. यामुळे पोलिसांना ससंर्ग होण्याचा धोका कमी होणार आहे. देशात संचारबंदी लागू आहे, तिचे प्रभावी अंमलबजावणी करण्याचे काम पोलिसांकडे आहे. ठिकठिकाणी पोलीस नागरिकांची तपासणी करत आहेत. यावेळी पोलिसांचा नागरिकांशी संबध येतो. त्यामुळे पोलीसही कोरोनाचे बळी ठरत आहेत. त्यावर उपाय म्हणून पंजाब सरकारने हा निर्णय घेतला आहे.