चंदिगढ - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंजाब सरकारने 1 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज(गुरुवारी) बैठकीत हा निर्णय घेतला. हा कठीण काळ असून सर्वांनी घरी रहावे, तसेच आरोग्यासंबंधी काटेकोरपणे सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सरकारने नागरिकांना केले आहे.
पंजाबमध्ये 1 मेपर्यंत लॉकडाऊन; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय - कोरोना लाईव्ह अपडेट
ओडिशा राज्यानंतर कर्फ्यू वाढविणारे पंजाब दुसरे राज्य ठरले आहे.
आत्तापर्यंत नागरिकांनी सरकारी सुचनांचे पालन केल्याबद्दल सरकारने आभार मानले आहे. ओडिशा राज्यानंतर कर्फ्यू वाढविणारे पंजाब दुसरे राज्य ठरले आहे. तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार कोरोना गंभीर आणि रौद्र रुप धारण करण्याची शक्यता आहे. कठीण परिस्थीतीचा सामना करण्यासाठी राज्य सरकार तयार असल्याचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी म्हटले आहे.
14 एप्रिलनंतर देशात लॉकडाऊन वाढविण्याबाबत केंद्र सरकार विचारमंथन करत आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पंतप्रधान मोदी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. पंजाब राज्यामध्ये आत्तापर्यंत 137 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मागील 24 तासात 21 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.