महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

धार्मिक स्थळी प्रसादालय चालवण्यास  पंजाब सरकारची परवानगी - पंजाब धार्मिक स्थळ प्रसादालय

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी राज्यातील धार्मिक ठिकाणी असलेले लंगर, प्रसादालये आणि सार्वजनिक उपाहारगृहे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आता या सर्व ठिकाणी जेवण वाटप करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी जेवण तयार करताना स्वच्छता बाळगणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

food
जेवण

By

Published : Jun 10, 2020, 5:13 PM IST

चंडीगड - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास बंदी आहे. या दरम्यान, पंजाब सरकारने लंगर, प्रसादालये आणि सार्वजनिक उपाहारगृहे सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी राज्यातील धार्मिक ठिकाणी असलेले लंगर, प्रसादालये आणि सार्वजनिक उपाहारगृहे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आता या सर्व ठिकाणी जेवण वाटप करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी जेवण तयार करताना स्वच्छता बाळगणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची मानक कार्यप्रणाली राज्यातील सर्व धार्मिक स्थळांवर लक्ष ठेऊन असेल, असे ४ जून रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. पंजाबमध्ये लंगर आणि प्रसादालयांच्या माध्यमातून दररोज हजारो नागरिकांना जेवण दिले जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details