महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मुलींनी रक्ताने लिहले राष्ट्रपतींना पत्र, न्याय मिळत नसेल तर इच्छा मरणाची मागितली परवानगी - मोगा

पोलिसांनी याप्रकरणी तपास करुन आमच्यावरील खोट्या गुन्ह्यांची चौकशी करण्याची विनंती केली. परंतु, पोलीस याप्रकरणी आमचे काहीही ऐकत नाहीत, असा आरोप मुलींनी केला आहे.

मुलींनी राष्ट्रपतींना लिहिले रक्ताने पत्र

By

Published : Jul 6, 2019, 2:19 PM IST

मोगा - पंजाब राज्यातील मोगा शहरात राहणाऱ्या २ मुलींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. आमच्यावर दाखल केलेले खोट गुन्हे माघारी घेण्यात यावेत, आम्हाला न्याय मिळाला नाही तर इच्छामरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या मुलींनी रक्ताने लिहिलेल्या पत्राद्वारे राष्ट्रपतींकडे केली आहे. निशा आणि अमनज्योत कौर अशी त्या मुलींची नावे आहेत.

आमच्यावर भा.दं.वि अंतर्गत कलम ४२० अंतर्गत २ खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये फसवणूक, घोटाळेबाजी आणि कबुतरबाजी केलेले आरोप आमच्यावर लावण्यात आले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तपास करुन आमच्यावरील खोट्या गुन्ह्यांची चौकशी करण्याची विनंती केली. परंतु, पोलीस याप्रकरणी आमचे काहीही ऐकत नाहीत. न्याय मिळाला नाहीतर आम्हाला कुटुंबासह इच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आम्ही केली आहे, असे निशा आणि अमनज्योत कौर यांनी म्हटले आहे.

घटनेबाबत बोलताना मोगा पोलीस अधिकारी कुलजिंदर सिंग म्हणाले, दोन्ही मुलींविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी सुरू आहे. त्यांनी राष्ट्रपतींना रक्ताने पत्र लिहिले आहे, असे मला कळाले आहे. परंतु, मला अधिकृतरित्या याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. आम्ही लवकरच मुलींविरोधात असणाऱया गुन्ह्याची चौकशी पूर्ण करणार आहोत.

ABOUT THE AUTHOR

...view details