महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 25, 2020, 5:40 PM IST

ETV Bharat / bharat

दिल्ली मार्च : केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची हरयाणा-पंजाब सीमेवर गर्दी

पंजाब हरयाणा सीमेवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. हरयाणा पोलिसांनी कितीही विरोध केला तरी आम्ही दिल्लीला नक्कीच पोहचू, असा विश्वास आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकरी आंदोलन
शेतकरी आंदोलन

चंदीगढ - केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणा आणि उत्तरप्रदेशच्या शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पंजाबमार्गे हरयाणात प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. पंजाब-हरयाणा सीमेवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. हरयाणा पोलिसांनी कितीही विरोध केला तरी आम्ही दिल्लीला नक्कीच पोहचू, असा विश्वास आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

हरयाणा-पंजाब सीमेवर शेतकऱ्यांची गर्दी

एक महिन्याचे राशन बरोबर

पंजाबमधून मोठ्या प्रमाणातून शेतकरी घरातून बाहेर पडून आंदोलनात सहभागी होत आहेत. दिल्लीला पोहचून अन्यायकारक तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याचे शेतकऱ्यांचे लक्ष्य आहे, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले. हरयाणा सरकारने नागरिकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. त्यावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, सर्व शेतकरी नेते हरयाणात एकत्र येणार आहेत. तेथून सर्वजण दिल्लीकडे कूच करणार आहेत. आंदोलक शेतकरी बरोबर सुमारे एक वर्षाचे राशन घेवून जात आहेत.

हरयाणा सरकारचा तगडा बंदोबस्त

कोरोना नियमावलीचे कारण देत हरयाणा सरकारने जमावबंदी लागू केली आहे. या नियमांचे पालन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बल तैनात केले आहे. कोरोनाची स्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांचे आंदोलन हरयाणा सरकारसाठी चिंतेचा विषय बनले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details