महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रुग्णालयाने प्रवेश नाकारल्यावर महिलेची पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीमुळे रस्त्यावरच प्रसूती

रात्री गस्तीवर असणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला एका महिलेच्या प्रसुतीसाठी मदत केली आहे. पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील धरमकोट येथील एक नव्हे तर तब्बल ३ रुग्णालयांनी गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी नकार दिल्याची घटना घडली आहे.

रुग्णालयाने प्रवेश नाकारल्यावर महिलेची पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीमुळे रस्त्यावरच प्रसुती
रुग्णालयाने प्रवेश नाकारल्यावर महिलेची पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीमुळे रस्त्यावरच प्रसुती

By

Published : Apr 5, 2020, 6:13 PM IST

चंदिगढ -लॉकडाऊनमुळे लोकांना अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. रात्री गस्तीवर असणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला एका महिलेच्या प्रसूतीसाठी मदत केली आहे. पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील धरमकोट येथील एक नव्हे तर तब्बल ३ रुग्णालयांनी गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी नकार दिल्याची घटना घडली आहे.

रस्त्याच्या कडेला महिलेला त्रास होताना दिसल्यानंतर बिक्कर सिंग आणि सुखजिंदर सिंग या दोन पोलिसांनी बाकडे जमवून शेजारील महिलांना गोळा केले. यानंतर महिलेने एका बाळाला जन्म दिला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी हरमनबीर सिंग गिल यांनी दिली. बिक्कर आणि सुखजिंदर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानता आणि माणुसकीमुळे बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details