नवी दिल्ली - निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींची याचिका आज न्यायालयाने फेटाळली आहे. निकालानंतर न्यायालयाबाहेर एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. दोषी अक्षयची पत्नी पुनीता देवी न्यायालयाच्या ईमारतीबाहेर बेशुद्ध पडल्याचे पाहायला मिळाले. 'माझ्या पतीसोबत मला आणि माझ्या अल्पवयीन मुलालाही फाशी द्या', अशी मागणी तिने केली.
निर्भया प्रकरण : दोषी अक्षयच्या पत्नीचा न्यायालयाबाहेर 'हाय व्होल्टेज ड्रामा' - Punita Devi wife of Akshay
दोषी अक्षयची पत्नी पुनीता देवी न्यायालयाच्या ईमारतीबाहेर बेशुद्ध पडल्याचे पाहायला मिळाले. 'माझ्या पतीसोबत मला आणि माझ्या अल्पवयीन मुलालाही फाशी द्या', अशी मागणी तीने केली.
'आम्हाला न्याय मिळेल, या आशेने आम्ही जगत होतो. गेल्या 7 वर्षांपासून आम्ही रोज मरत आहोत. माझ्या पतीसोबत मला आणि माझ्या अल्पवयीन मुलालाही फाशी द्या. मला न्याय द्या. मलाही मारून टाका. माझा पती निर्दोष आहे. हा समाज त्यांच्या मागे लागलाय', असे न्यायालयाबाहेर पुनीता देवी ओरडत आणि रडत होती. दरम्यान पुनीताने घटस्फोटासाठी देखील अर्ज केला आहे. मी विधवा म्हणून जगू शकत नाही. म्हणून मला माझ्या पतीपासून घटस्फोट पाहिजे, असे ती म्हणाली होती.
निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषी मुकेश, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा आणि अक्षय ठाकूर यांना उद्या(20 मार्च) पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात येणार आहे. कायद्यातील सर्व पळवाटा संपल्यामुळे उद्या दोषींना फाशी होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दिल्लीतील तिहार तुरुंगात चौघांना फाशी देण्यात येणार आहे.