अहमदाबाद - पुलवामा हल्ला हा भाजपचा 'गोध्रा'सारखाच 'कट' होता, असे वादग्रस्त वक्तव्य गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी केले आहे. 'पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेले आरडीएक्सने भरलेल्या वाहनाच्या नोंदणीमध्ये सुरुवातीचा अक्षरे 'GJ' म्हणजे गुजरात अशी होती. 'गोध्रा' हाही कट होता,' असे वाघेला यांनी म्हटले आहे. त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
'भाजप सरकारने निवडणूक जिंकण्यासाठी दहशतवादाचा वापर केला आहे. मागील ५ वर्षांत दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये कोणीही ठार झाले नाही. कोणतीही आंतरराष्ट्रीय संस्थादेखील २०० दहशतवादी मारले गेल्याचा पुरावा देऊ शकली नाही. बालाकोट एअर स्ट्राईक हाही पूर्वनियोजित कट होता. हे घडणारच होते,' असे वाघेला म्हणाले.