VIDEO: लॉकडाऊन काळात तणाव कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स - भोपाल न्यूज
परिक्षांच्या तारखा सतत पुढे ढकलण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परिक्षा आणि करिअरचं टेंशन दिवसेंदिवस वाढत आहे.
भोपाळ - लॉकडाऊमुळे सर्व विद्यार्थी ऐन परिक्षांच्या काळात घरात अडकून पडले आहेत. परिक्षांच्या तारखा सतत पुढे ढकलण्यात येत आहेत. परिक्षेसाठी केलेली मेहनत वाया जाण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे.परिक्षा आणि करिअरचं टेंशन दिवसेंदिवस वाढत आहे. सगळीकडे अनिश्चित्ता पसरली आहे. या तणावाचा विद्यार्थ्यांनी कसा सामना करावा याबाबत ईटीव्ही भारतने प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ गौरव गिल यांच्याशी चर्चा केली. तणावापासून दूर राहण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.