चंडीगढ - देशात मागच्या 10 दिवसांपासून लॉक डाऊन सुरू आहे. या काळात नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे लॉक डाऊन नागरिकांच्या आरोग्यासाठीच आवश्यक आहे. मात्र, घरात रिकाम्या वेळेत अनेक विचार करून करून काही लोकांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. यासंबंधी ईटीव्ही भारत ने चंडीगढ येथील सुप्रसिध्द मनोवैज्ञानिक डॉ. शितल शर्मा यांच्याशी बातचीत केली आहे.
लॉकडाऊनमध्ये मानसिक तणाव कसा दूर कराल?, पाहा मुलाखत प्रश्न - या लॉक डाऊन मुळे लोकांचे मानसिक स्वास्थ बिघडत आहे का?उत्तर -याचे बरेच कारण सांगता येतील. सतत घरात बसून लोकांना अनेक विचार येत असतात. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतो. दैनंदिन कामाची सवय असते. त्यामुळे अचानक एकच ठिकाणी बसून लोकांना मानसिक तणाव निर्माण होतो. बरेच लोक या लॉक डाऊन ला त्रास समजत आहेत. त्यामुळे त्यांना अशा परिणामांना सामोरे जावे लागत आहे.प्रश्न - मानसिक तणाव कसा कमी करावाउत्तर -सगळ्यात आधी तर मानसिक तणाव कशामुळे होत आहे याचे कारण शोधले पाहिजे. जास्त काम केल्यामुळे तणाव निर्माण होतोय का, जेवण बनवल्यामुळे निर्माण होत आहे का, मुलांमुळे परिणाम होत आहे का, या सर्व गोष्टींचे आकलन करून कुटुंबीयांशी संवाद साधावा. यामुळे तुम्हाला सहकार्य मिळेल, असे शितल यांनी सांगितले. दुसरा पर्याय हा की, जेव्हा तुम्ही घरात आता तेव्हा लहान मुलांना देखील इतर कामात व्यग्र करू शकता. त्यामुळे मुले तुम्हाला त्रास देणार नाहीत.तिसरा पर्याय म्हणजे घरातील ज्येष्ठ व्यक्ती सोबत संवाद सध्या. त्यांची काळजी घ्या. त्यांच्या काळजी घेणं म्हणजे फार मोठी जबाबदारी आहे, असा विचार करून तणाव निर्माण करू नका. त्यांना तुमच्या कामात सहभागी करून घ्या, असे उपाय डॉ. शितल यांनी सांगितले आहेत.