चेन्नई - पीएसएलव्ही सी-४८ या यानाची मोहीम यशस्वीपणे पार पडली आहे. 'रिसॅट २ बीआर १' या रडार इमेजिंग अर्थ ऑबजर्वेशन उपग्रहासह नऊ विदेशी उपग्रह त्यांच्या कक्षेत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, श्रीहरीकोटावरून झालेली ही ७५ वी, तर पीएसएलव्ही यानाची ही ५० वी मोहीम होती.
पीएसएलव्ही सी-४८ या यानाद्वारे भारताचा 'रिसॅट-२ बीआर-१' हा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला. ६२८ किलो वजनाच्या या उपग्रहामुळे शेती, वनीकरण आणि आपत्ती व्यवस्थापन अशा क्षेत्रांमध्ये काम करण्यास मदत होईल. तसेच, लष्करी कामगिरीसाठीही या उपग्रहाचा मोठा फायदा होऊ शकेल, अशी माहिती इस्रोच्या सूत्रांनी दिली आहे.