नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षासमोर भाजपचा निभाव लागला नाही. तब्बल २०० पेक्षा जास्त नेत्यांची फौज दिल्लीमध्ये प्रचारासाठी उतरवण्यात आली होती. मात्र, तरीही भाजपचा पराभव झाला. दिल्लीतील पराभवावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मौन सोडले आहे. भाजप नेत्यांनी केलेली वक्तव्ये पराभवाला कारणीभूत ठरली असावीत, अशी कबूली त्यांनी दिली आहे.
'दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभव आम्हाला मान्य आहे. मात्र, देश के गद्दारों को, गोली मारो *** को, अशी वक्तव्ये टाळायली पाहिजे होती. अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे कदाचित भाजपला तोटा झाला असावा, असे अमित शाह यांनी मान्य केले. ते दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.