महाराष्ट्र

maharashtra

'अयोध्येत कार सेविकांवर गोळीबार करण्याचे आदेश न देल्याचा मला अभिमान'

By

Published : Aug 1, 2020, 2:51 PM IST

अयोध्येत जमलेल्या कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश मी दिले नाही. याचा मला अभिमान आहे, असे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते कल्याण सिंह म्हणाले.

कल्याण सिंह
कल्याण सिंह

नवी दिल्ली - अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा बुधवारी अर्थात 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत होणार आहे. या कार्यक्रमात राम मंदिर उभारण्यासाठी पुढाकार घेतलेल्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना बोलवण्यात आले आहे. यावर कल्याण सिंह यांनी आनंद व्यक्त केला आहे.

1992 मध्ये उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री होते. तेव्हा अयोध्येत जमलेल्या कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश मी दिले नाही. याचा मला अभिमान आहे, असे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते कल्याण सिंह म्हणाले. कारवाईचे आदेश न दिल्याने कल्याण सिंह यांना सत्ता गमावावी लागली होती. तसेच तुरूंगातही जावे लागले होते.

दरम्यान अयोध्येतील श्री राम जन्मभूमीत प्रभू रामचंद्रांचं भव्य मंदिराचं भूमिपूजन केलं जाणार आहे. येत्या बुधवारी पंतप्रधान मोदी सकाळी 11:30 वाजता अयोध्येत पोहोचून भाषण करतील. जवळपास दोन तास हा कार्यक्रम चालणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, त्याचप्रमाणे रामजन्मभूमी आंदोलनातील अग्रणी नेते विनय कटीयार, कल्याण सिंह यांच्यासह अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details