4.49 PM : 'कॅब' विरोधी आंदोलन पसरले पश्चिमबंगालमध्येही पसरले..
4.30 PM : आसाममधील आंदोलनात आतापर्यंत चार जणांचा बळी..
4.26 PM : ईशान्य भारतातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शाहांचा शिलॉंग दौरा रद्द..
1:00 PM : कॅब विरोधा आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांचा भारत दौरा लांबणीवर..
गुवाहटी - नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत पास झाले आहे. मात्र, या विधेयकाला विरोध करत संपूर्ण ईशान्य भारत रस्त्यावर उतरला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी ईशान्येकडील राज्यांमध्ये जाळपोळ, आंदोलने, रॅली आणि जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. या आंदोलनावेळी पोलीस गोळीबारात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एक दिपांजल दास हा गुवाहटीमधील आर्मी कॅन्टीनचा कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलांची दमछाक होत आहे. आंदोलकांनी काल माजुली जिल्ह्यातील भाजप मुख्यालयावर हल्ला केला होता.
ईशान्य भारतातील आंदोलन चिघळलं, भाजप मुख्यालयावर हल्ला
हेही वाचा- नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचे पडसाद, ईशान्येकडील राज्यात आंदोलन
संचारबंदीचा आदेश झुगारून गेल्या दोन दिवसांपासून नागरिक विधेयकाच्या विरोधात आंदोलन करत आहेत. आसामधील शाळा महाविद्यालये कालपासून तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. आसामधील दहा जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था आंदोलनामुळे ढासळली आहे. स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनामुळे ईशान्येकडील राज्यांमधील जनजीवन ठप्प झाले आहे. मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आसाममधील अनेक जिल्ह्यांत गुरुवारी सायंकाळी ७ पर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तर १० जिल्ह्यांमधील संचारबंदी ही ४८ तासांसाठी वाढवण्यात आली आहे. राज्यातील परिस्थिती नियंत्रणामध्ये आल्यानंतर संचारबंदी हटवण्यात येईल, असे पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंत यांनी सांगितले.
ईशान्य भारतातील आंदोलन चिघळलं
हेही वाचा- नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात ईशान्येकडील राज्यात आंदोलन सुरू
केंद्र सरकारने बुधवारी निमलष्करी दलाच्या ५ हजार जवानांना आसामसह ईशान्येकडील राज्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात केले आहे. २ हजार जवान काश्मीरमधून, तर 3 हजार जवान देशातील इतर भागांतून ईशान्येकडील राज्यात पाठवण्यात आले आहेत.