महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

CAA Protest Live: देशभर हिंसक आंदोलन; लखनौमध्ये गोळी लागून एकाचा तर मंगळूरमध्ये 2 जणांचा मृत्यू - बिहार CAA आंदोलन

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरातील विविध शहरांमध्ये आंदोलन सुरू आहे. दिल्ली बंगळुरूमध्ये संचारबंदी लागू असूनही आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. याबरोबरच अनेक राज्यातील छोट्या मोठ्या शहरांमध्येही आंदोलन सुरू आहे.

CAA PROTEST
नागरित्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन

By

Published : Dec 19, 2019, 12:17 PM IST

Updated : Dec 19, 2019, 11:20 PM IST


नवी दिल्ली- नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून देशभरातील विविध शहरांमध्ये आंदोलन सुरू आहे. दिल्ली बंगळुरूमध्ये संचारबंदी लागू असूनही आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत.

Live:

  • कर्नाटक सरकार: मंगळुरू शहर व दक्षिण कन्नड जिल्ह्यात मोबाइल इंटरनेट सेवा 48 तासांसाठी बंद.
    लखनऊमधील आंदोलन
  • उत्तरप्रदेश - गाझियाबाद जिल्ह्यामध्ये रात्री १० वाजल्यापासून उद्या सकाळी १० वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाचा निर्णय
    इतिहास तज्ज्ञ रामचंद्र गुहा यांना अटक
  • मंगळूरमध्ये आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत.
  • मध्य प्रदेशमधील 44 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.
    संचारबंदी असूनही देशभरात आंदोलन
  • लखनौमध्ये जवळपास 40 ते 50 आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात एका आंदोलकाचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. मोहम्मद वकील असे त्या युवकाचे नाव आहे. गोळी लागल्यानंतर त्याला ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, सायंकाळी ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा तरुण ठाकूरगंज येथी सज्जाद बागचा रहिवासी असल्याची माहिती आहे.
    संबळ यथे आंदोलकांनी बसला आग लावली
  • आंदोलनाच्या नावाखाली तोडफोड करणाऱ्यांची संपत्ती जप्त होणार - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
  • गुजरात: अहमदाबादमधील शाह आलम भागात आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड केली. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून पोलिसांनी आंदोलकांना पांगवले.
    लखनऊमध्ये आंदोलन
  • कर्नाटकातील मंगळुरू विभागामधील ५ पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात उद्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी
  • शाळा, महाविद्यालये, मेट्रो, इंटरनेट फोन बंद करण्याचा सरकारला अधिकार नाही. संचारबंदी लागू करून सरकार शांततेत आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. - राहुल गांधी
  • मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानात बॉलिवूड सीने अभिनेता फरहान अख्तरने देशामध्ये भेदभाव होत असल्याचे व्यक्त केले मत..
  • कर्नाटकातील मंगळुरू महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालये उद्या (शुक्रवारी) बंद राहतील - एस. पी हर्षा, मंगळुरू पोलीस आयुक्त
  • नागरिकता दुरुस्ती कायद्यावरून केंद्र सरकारने कायम विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे जाहीर केली आहेत. नागरिकांमध्ये 'एनआरसी' आणि 'सीएए' कायद्यावरून काही संभ्रम निर्माण होऊ नये, म्हणून ही माहिती जाहीर केली आहे. याद्वारे सरकारने लोकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही कायद्यातला फरक सांगण्यात आला आहे.
  • नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला किती लोकांचा पाठिंबा आहे आणि किती लोकांचा विरोध, हे पाहण्यासाठी संयुक्त राष्ट्र किंवा मानवी हक्क आयोगाच्या देखरेखीखाली समिती स्थापन करावी - ममता बॅनर्जी
  • आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक बोलावली आहे. थोड्याच वेळात बैठक सुरू होणार आहे.
  • उत्तरप्रदेशातील आंदोलनात २० दुचाकी, १० कार, ३ बस आणि ४ मीडिया ओबी व्हॅन पेटवून देण्यात आल्या. आंदोलकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. पोलिसांनी ४० ते ५० जणांना ताब्यात घेतले आहे. दोन पोलीस ठाणी आंदोलकांनी पेटवून दिली.
  • ७३ वर्षानंतर अचानकपणे आपण भारताचे नागरिक आहोत हे सिद्ध करावे लागत आहे. भाजप देशाचे विभाजन करत आहे. आंदोलन थांबवू नका, आपल्याला कायदा रद्द करायचा आहे - ममता बॅनर्जी
  • अहमद पटेल, जोतिरादित्य सिंधिया, आरपीएन सिंग आणि दिपेंद्र सिंग हुडा देशभर पेटलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या घरी आले आहेत. या ठिकाणी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे.
  • दिल्लीतील अनेक मेट्रो स्थानके आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आली आहेत. जंतरमंतर भागात आंदोलन
  • दिल्ली विमानतळरील ८ उड्डाणे २० ते १०० मिनिटांनी उशिरा
  • मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी नागरिकांची गर्दी
  • नागरिकत्व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये इंटरनेट सेवा उद्या (शुक्रवार) ९ पर्यंत बंद राहणार
  • दिल्लीतील अनेक मेट्रो स्थानकाचे दरवाजे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आले आहेत.
  • उत्तरप्रदेशातील हजरतगंज येथे आंदोलनाला हिंसक वळण. आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलकांना पांगवले. यावेळी आंदोलकांनी एका माध्यमाच्या वाहनाला आग लावली.
  • महाराष्ट्रातील नागपूरमध्ये नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन
  • दिल्ली- गुरुग्राम महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया प्रवाशांना तिकीट रद्द केल्यावर पैसे परत देणार.
  • दिल्लीतील ऑल इंडिया इस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने कर्मचाऱ्यांना आंदोलनात भाग घेण्यापासून मज्जाव केला.
  • गुजरातमध्ये आंदोलनावेळी पोलिसांचा लाठीचार्ज
  • जामिया विद्यापीठाबाहेर मुस्लीम बांधवांनी पढले नमाज
  • लखनऊमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून हिंसक आंदोलन सुरू
  • उत्तरप्रदेशातील संभळ येथे आंदोलकांनी बस पेटवून दिली
  • वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांना दिल्लीत आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतले.
  • काँग्रेस आमदार रिझवान अर्शद यांना बंगळुरूमधील टाऊन हॉल परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.
  • नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर सुरक्षा व्यवस्था वाढवली.
  • आंदोलकांनो हिंसक होऊ नका, शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांचे आवाहन. कोणताही धर्म कायद्यातून वगळू नका, अशी मागणी मी संसदेत मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
  • कोलकात्यात चित्रपट निर्मात्या अपर्णा सेन यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधातील आंदोलनात सहभाग घेतला.
  • जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, याचिकाकर्त्याची दिल्ली उच्च न्यायालयात मागणी. विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप.
  • आसाम आंदोलन - काँग्रेस नेते हरिश रावत आणि रिपून बोरा यांनी नागरिकत्व विरोधी आंदोलनात गुवाहटीमध्ये सहभाग घेतला.
  • गुजरातमधील अहमदाबाद शहरात आंदोलन आणि मोर्चा आयोजित करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. कायद्याचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन
  • चंदीगड शहरामध्ये मुस्लिम संघटनांनी वादग्रस्त कायद्याविरोधात आंदोलन पुकारले आहे.
  • आसाम आंदोलन - काँग्रेस नेते हरिश रावत आणि रिपून बोरा यांनी नागरिकत्व विरोधी आंदोलनात गुवाहटीमध्ये सहभाग घेतला.
  • गुजरातमधील अहमदाबाद शहरात आंदोलन आणि मोर्चा आयोजित करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. कायद्याचे पालन करण्याचे नागरिकांनी आवाहन
  • चंदीगड शहरामध्ये मुस्लिम संघटनांनी वादग्रस्त कायद्याविरोधात आंदोलन पुकारले आहे.
  • काँग्रेस नेते संदिप दिक्षित यांना मंडी हाऊस येथे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
  • दिल्लीच्या काही भागांमध्ये इंटरनेटसह व्हाईस कॉल आणि एसएमएस सेवाही बंद. सरकारकडून आदेश दिला गेल्याची भारती एअरटेलची माहिती.
  • जेएनयूचा माजी विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ता उमर खालिदला पोलिसांनी ताब्यात घेतले.
  • बंगळुमधील टाऊन हॉल भागातील आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
  • अनेक ठिकाणी कायद्याला विरोध होत असताना दिल्लीतील सराय जुलेना गावामध्ये नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला आहे.
  • तेलंगणातील हैदराबाद शहरात नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून आंदोलन. चारमिनार परिसरात पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
  • बंगळुरू शहरात अफवा पसरवण्यात येत आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नका, बंगळुरू पोलिसांचे आवाहन
  • दिल्ली शेजारच्या राज्यातील नागिरक दिल्लीकडे येत असल्याची माहिती गृहमंत्रालयाला मिळाली आहे. त्यानुसार सीमेवर सुरक्षा व्यवस्था बाळगण्यात येत आहे.
  • इतिहास तज्ज्ञ रामचंद्र गुंहा यांनी बंगळुरु पोलिसांनी आंदोलनादरम्यान ताब्यात घेतले आहे.
  • कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधात डावे पक्ष मुस्लीम संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. २० आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
  • पोलीस नाकाबंदीमुळे दिल्ली- गुरुग्राम महामार्गावर वाहतूक कोंडी
  • दिल्लीतील लाल किल्ला भागात संचारंबदी लागू असतानाही मोठ्या प्रमाणात आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत.
  • कर्नाटकातील बंगळुरू शहरात डाव्या विचाराच्या पक्षांनी नागरिकत्व कायद्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. मैसुर बँक चौकात मोठ्या प्रमाणात नागरिक जमले आहेत. या आंदोलकांना पोलीस ताब्यात घेत आहेत.
Last Updated : Dec 19, 2019, 11:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details