झाशी (उत्तर प्रदेश) - महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशहून आपल्या घरी निघालेल्या कामगारांना झाशी येथील जनपद बॉडरवर पोलिसांकडून अडवण्यात आले. त्यानंतर वैतागलेल्या कामगारांंनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. यामुळे जवळपास 15 किमीच्या रस्त्यावर वाहतूककोंडी निर्माण झाली होती.
उत्तर प्रदेशमध्ये स्थलांतरित कामगारांचा रोष.. रस्ता अडवल्यामुळे कामगारांमध्ये नाराजी
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार कामगारांनी भरून चाललेला ट्रक बॉर्डवर अडवण्यात आला. त्यानंतर मजुरांच्या रोषाला उत्तरप्रदेश पोलिसांना तोंड द्यावे लागले.
उत्तर प्रदेशमध्ये स्थलांतरीत कामगारांचा रोष.. रस्ता अडवल्यामुळे कामगारांमध्ये नाराजी
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार कामगारांनी भरून चाललेला ट्रक बॉर्डवर अडवण्यात आला. त्यानंतर मजुरांच्या रोषाला उत्तरप्रदेश पोलिसांना तोंड द्यावे लागले. कामगारांना त्यांना घरी जावू देण्याची मागणी केली. त्यानंर पोलिसांनी बसची व्यवस्थ करत असल्याचे सांगितले.
दरम्यान, महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने, एक रुग्णवाहिका येथेच अडकून पडली. घटनास्थळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक दाखल झाले. मात्र, समस्या सुटली नाही.