महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कलम ३७० हटविल्याबद्दल मोहाली येथे होणारे निदर्शन पोलिसांनी हाणून पाडले

निदर्शनकर्ते मनसा व भटींडामार्गे मोहाली कडे जात होते. मोहालीतील दशहेरा मैदान येथे काल विरोध प्रदर्शन करण्याचा त्यांचा बेत होता. मात्र पोलिसांनी त्यांना वाटेतच अडविले. त्यामुळे निदर्शनकर्त्यांनी महामार्ग जाम केला व तेथेच विरोध करने सुरू केले.

आंदोलनकर्ता

By

Published : Sep 16, 2019, 8:35 AM IST

मोहाली (पंजाब)- जम्मु काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हे केंद्र सरकारकडून रद्द करण्यात आले होते. त्याचे पडसाद आता मोहाली येथे दिसून आले आहे. पंजाबामधील काही समुहांनी शेतकरी संघटनांच्या मदतीद्वारे कलम ३७० हटविल्याबद्दल विरोध करण्याचे योजिले होते. मात्र पोलिसांनी त्यांचा बेत हाणून पाडला आहे.

माहिती देतना आंदोलनकर्ता

निदर्शनकर्ते मनसा व भटींडामार्गे मोहालीकडे जात होते. मोहालीतील दशहेरा मैदान येथे काल विरोध प्रदर्शन करण्याचा त्यांचा बेत होता. मात्र पोलिसांनी त्यांना वाटेतच अडविले. त्यामुळे निदर्शनकर्त्यांनी महामार्ग जाम केला व तेथेच विरोध करने सुरू केले. मोहाली शहरात रविवारी जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यासंबंधी आंदोलने करू नये, असे मोहाली प्रशासनाकडून आदेश देण्यात आले होते. त्याचबरोबर, संबंधीत प्रशासनाने कलम १४४ लावले होते. या कलमेनुसार ५ किवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या जमावाला एका ठिकाणी जाण्यास बंदी असते. त्याचबरोबर पोलिसांनी शहराच्या आत प्रवेश देणाऱ्या सर्व मार्गांना बंद केले होते. मात्र प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता सदरील संघटनांच्या लोकांनी शहरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना वाटेतच आडविले.

हेही वाचा-अखिलेश यादवांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांचा गोंधळ, दोन जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details