नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी पीडितीचे मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. या घटनेचा संपूर्ण देशातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. देशभरामध्ये या घटनेविरोधात प्रदर्शन होत असून आरोपींना फाशी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
हाथरस बलात्कार घटनेचा संपूर्ण देशातून निषेध
उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा संपूर्ण देशातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. देशभरामध्ये या घटनेविरोधात प्रदर्शन होत असून आरोपींना फाशी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
19 वर्षीय दलित तरुणी शेतात गेली असता चार तरुणांनी तिच्यावर अत्याचार केले होता. तसेच तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला होता. मंगळवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे.
या घटनेनंतर योगी आदित्यनाथ सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.आज काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना आडवण्यात आले. तसेच जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.