महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचा जीवनपट

छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे आज निधन झाले. २००० ते २००३ पर्यंत त्यांनी राज्याची धुरा सांभाळली होती. जोगी हे विधानसभेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य राहिले आहेत. मात्र, ज्या पक्षाने त्यांना मुख्यमंत्रीपद दिले होते, त्याच पक्षातून २०१६ मध्ये त्यांना आणि त्यांच्या मुलाला बडतर्फ करण्यात आले होते. जोगी यांचा जीवनपट कसा राहिला याचा धावता आढावा घेऊयात...

Profile of first CM of Chhattisgarh ajit jogi
छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचा जीवनपट...

By

Published : May 29, 2020, 5:20 PM IST

रायपूर - छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे आज निधन झाले. २००० ते २००३पर्यंत त्यांनी राज्याची धुरा सांभाळली होती. जोगी हे विधानसभेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य राहिले आहेत. मात्र, ज्या पक्षाने त्यांना मुख्यमंत्रीपद दिले होते, त्याच पक्षातून २०१६मध्ये त्यांना आणि त्यांच्या मुलाला बडतर्फ करण्यात आले होते. पाहुया, जोगी यांचा जीवनपट...

जोगी यांचा जन्म बिलासपूर जिल्ह्यातील पेंड्रा रोडच्या जोगी डोंगरीमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव काशी प्रकाश जोगी होते. २९ एप्रिल १९४६ला त्यांचा जन्म झाला होता. ८ ऑक्टोबर १९७५ला त्यांचे रेणु जोगी यांच्याशी लग्न झाले. त्यांना एक मुलगा (अमित) आणि एक मुलगी (अनुषा) आहे. त्यांनी बीई, एलएलबी आणि एमआयई अशा पदव्या मिळवल्या होत्या. तसेच राजकीय क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकारी म्हणूनही काम केले होते.

छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचा जीवनपट...

अजित जोगी यांचा जीवनपट...

  • 1968मध्ये त्यांनी मौलाना आझाद कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, भोपाळ मधून मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. त्यांना सुवर्णपदक मिळाले होते.
  • 1974मध्ये त्यांची भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवा यासाठी निवड झाली.
  • 1974 ते 1986 यादरम्यान त्यांनी मध्यप्रदेशच्या सीधी, शहडोल, रायपूर आणि इंदौर जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय सेवा बजावली. याचदरम्यान त्यांनी प्राध्यापक म्हणूनही काम केले, हे विशेष.

अजित जोगी यांचा राजकीय प्रवास...

  • १९८६मध्ये अनुसुचित जाती आणि जमातींच्या कल्याणासाठी कार्य करता यावे यासाठी त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (एआयसीसी) सदस्यत्व मिळवले. तेव्हा काँग्रेसकडून राज्यसभेवर त्यांची निवड करण्यात आली. १९९८ पर्यंत सलग दोन सत्र ते राज्यसभेचे सदस्य होते.
  • १९८७मध्ये त्यांना राज्य काँग्रेस कमिटीच्या महासचिवपदी नियुक्त करण्यात आले. यासोबतच ते राज्य अनुसुचित जाती आणि जमाती आयोगाचे अध्यक्षही होते.
  • १९८९मध्ये त्यांना काँग्रेस पक्षाने मणिपुरच्या लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केले. यावेळी त्यांनी जवळपास १५०० किलोमीटर अशा आदिवासी भागामध्ये निवडणुकीसाठी जनजागृती करण्याचे काम केले.
  • १९९५मध्ये अशाच प्रकारचे काम त्यांनी सिक्कीममध्ये केले.
  • १९९६मध्ये ते एआयसीसीच्या कोअर कमिटीचे सदस्य होते. त्यानंतर ते संसदेमधील काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे सदस्य होते.
  • १९९७ मध्ये ते दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीचे निवडणूक सदस्य होते, तसेच त्यांना पर्यवेक्षक म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते.
  • १९९७ ते १९९९ दरम्यान ते काँग्रेसच्या संसदीय समितीचे आणि एआयसीसीचे मुख्य प्रवक्ता होते.
  • १९९८ मध्ये झालेल्या १२ व्या लोकसभेसाठी छत्तीसगडच्या रायगड मतदारसंघातून ते निवडून आले.
  • १९९९मध्ये त्यांनी संयुक्त छत्तीसगडच्या मागणीसाठी आयोजल्या गेलेल्या यात्रेचे नेतृत्व केले होते.
  • २००० सालच्या नोव्हेंबरमध्ये नव्यानेच स्थापन झालेल्या छत्तीसगड राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ९ नोव्हेंबरला शपथ घेतली.
  • २००३मध्ये त्यांनी छत्तीसगड विकास यात्रेचे नेतृत्व केले.
  • २००४मध्ये १४व्या लोकसभेसाठी छत्तीसगडच्या महासमुंद मतदारसंघातून ते निवडून आले.
  • २००८मध्ये मरवाही मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून त्यांची छत्तीसगड विधानसभा सदस्य म्हणून निवड झाली.
  • २००९मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये महासमुंद मतदारसंघातून ते निवडून आले. मात्र ही जागा त्यांना २०१४मध्ये राखता आली नाही.
  • २०१६ला पक्षविरोधी कृत्ये केल्यामुळे त्यांना काँग्रेमधून बडतर्फ करण्यात आले.
  • २०१८मध्ये त्यांनी आपला स्वतःचा पक्ष जनता काँग्रेस छत्तीसगड स्थापन करत, बसप आणि सीपीआय यांच्यासोबत युती करत निवडणूक लढवली. यामध्ये जेसीसीने ५५ तर बसपने ३५ जागांवर निवडणूक लढवली होती.

जोगींच्या काही विशेष बाबी...

  • जोगींनी 'The Role of District Collector', 'Administration of Peripheral Areas', 'दृष्टीकोन', 'मोर मांदर के थाप', 'स्वर्ण कण जन' (माझे प्रेरणा स्त्रोत), 'सदी के मोड़ पर' ही पुस्तके लिहिली आहेत.
  • १९८१ ते १९८५ पर्यंत ते इंदूर जिल्हाचे जिल्हाधिकारी होते.
  • विख्यात क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांचे ते वर्गमित्र होते.
  • २००४मध्ये झालेल्या एका कार अपघातात त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details