नवी दिल्ली - कोरोनामुळे लॉकडाऊन असतानाही उद्यापासून देशात १५ विशेष प्रवासी रेल्वे सुरू करण्यात येणार आहेत. रेल्वे विभागाची ऑनलाईन बुकिंग वेबसाईट आणि मोबाईल अॅप्लीकेशन सुरू होण्यात अडचण येत होती. विशेष गाड्यांची माहीती वेबसाईटवर अपडेट होत असून थोड्याच वेळात सेवा सुरु होईल, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने ट्विट करून दिली होती. मात्र, आता बुकिंग सेवा सुरु झाली आहे. उद्यापासून प्रवासी गाड्या सुरु होणार आहेत.
विशेष गाड्यांतून प्रवास करण्यासाठी रेल्वे विभागाची नियमावली
- श्रमिक विशेष रेल्वे गाड्यांबरोबर प्रवाशांसाठी रेल्वेने ही अतिरिक्त सेवा सुरु केली आहे.
- प्रवासावेळी मास्क घालणे बंधणकारक
- १st class AC , २nd class AC आणि ३rd class AC क्लासमधून प्रवास
- प्रवाशांना आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून फक्त ऑनलाईन तिकिट मिळणार आहे.
- फक्त सात दिवस आधी तिकीट आरक्षित करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- प्रवाशांनी स्वत:चे पाणी आणि खाद्यपदार्थ घेऊन यावे.फक्त पाकिटबंद खाद्यपदार्थ मिळतील
- रेल्वे गाडी सुटण्याआधी प्रवाशांनी किमान ९० मिनिटे आधी स्टेशनवर पोहचावे. त्या काळात प्रवाशांची प्राथमिक तपासणी केली जाईल.
- रेल्वेमध्ये उश्या, चादरी, पडदे काहीही पुरविले जाणार नाहीत. प्रवाशांनी स्वत:चे पांघरून घेऊन यावे.
- तिकिट बुक झालेल्या प्रवाशांनाच आत प्रवेश दिला जाणार आहे.
- आरोग्य सेतू अॅप प्रवाशांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करणे बंधनकारक
- तिकिटात केटरींग चार्जेस असणार नाहीत.
वेबसाईटवर लॉगईन होत नसल्याने बुकिंग कोठून करणार हा प्रश्न आहे. फक्त ऑनलाईन तिकीटच मिळणार असून एक तास आधी स्टेशनवर हजर रहावे लागणार आहे. सोशल डिस्टंन्सिंगचे सर्व नियम पाळूनच प्रवास करता येणार आहे. प्रवाशांना मास्क किंवा तोंडाला रुमाल बांधणे अनिवार्य करण्यात आले आहे.