नवी दिल्ली - काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज पुन्हा एकादामुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे त्यांनी म्हटले आहे. जनतेची सुरक्षा करण्यात उत्तर प्रदेश सरकारकमी पडत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
योगींच्या राज्यात व्यापारी, मुले, महिलांसह कोणीच सुरक्षित नाहीत - प्रियंका गांधी - काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज पुन्हा एकादा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे त्यांनी म्हटले आहे. जनतेची सुरक्षा करण्यात उत्तर प्रदेश सरकार कमी पडत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
![योगींच्या राज्यात व्यापारी, मुले, महिलांसह कोणीच सुरक्षित नाहीत - प्रियंका गांधी Priyanka slams Yogi govt over law and order](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9318009-22-9318009-1603711503222.jpg)
प्रियंका गांधी
उत्तर प्रदेशमध्ये एका लोखंड व्यावसायिकाचे अपहरण करण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबीयांकडे आरोपींनी एक कोटी रुपयांची मागणी केली आहे. या बातमीचा संदर्भ आपल्या ट्विटमध्ये देत प्रियंका यांनी योगी सरकारला धारेवर धरले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात महिला, मुले, व्यापारींसह कोणीच सुरक्षित नसल्याची टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. मात्र सरकार प्रचार दौरे आणि बैठकांमध्ये व्यग्र असल्याचीही टीका त्यांनी केली आहे.