नवी दिल्ली -काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी कोरोना चाचणीच्या मुद्द्यावरून उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली. चाचणी नाही म्हणजे कोरोना नाही ही पॉलिसी लोकांना अंधारात ठेवण्यासाठी आहे, असे त्या म्हणाल्या.
कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या घेत असल्यावरून राज्याचे मुख्य सचिव एका जिल्हाधिकाऱ्यांवर संतापले. या संबधीचे ट्विट माजी आयएएस अधिकाऱ्याने केले होते. त्यानंतर या माजी अधिकाऱ्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता, असे वृत्त माध्यमांमध्ये आले होते. त्याचा हवाला देत प्रियंका गांधींनी भाजप सरकारला लक्ष्य केले.