नवी दिल्ली - अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तरप्रदेशातील 69 हजार प्राथमिक शिक्षक भरतीला स्थगिती दिल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधीनी सरकारला फटकारले आहे. संपुर्ण भरती प्रक्रियेत सरकारचा निष्काळजीपणा समोर आला आहे, असा आरोप त्यांनी योगी सरकारवर केला.
69 हजार शिक्षकांच्या भरतीवर प्रश्नचिन्ह
प्रियंका गांधी म्हणाल्या की, 69 हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया थांबली. हे योगी सरकारच्या निष्काळजीपणामुळे आणि प्रशासकीय अपयशामुळे झाले. पेपरफुटी, कटऑफ मार्कांचा गोंधळ आणि इतर अडचणींमुळे भरती प्रक्रिया ठप्प झाली आहे, सरकार तरुणांच्या नाराजीचा सामना करत आहे.
आज अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने 69 हजार सहाय्यक सामान्य पदांच्या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 12 जुलैला होणार आहे. या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अनेक याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत. प्रश्न/ उत्तर पत्रिकेत काय आक्षेप आहेत, ते जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले आहेत. तसेच सरकार विद्यापीठ अनुदान आयोगाकडेही याचिकाकर्त्यांचे आक्षेप जमा करणार आहेत.
राज्याच्या प्राथमिक शिक्षण मंडळाने 69 हजार पदभरतीचा निकाल जाहीर केला आहे. या सबंधी कॉउन्सलिंग सेशन बुधवार पासून प्रस्तावित होते. योगी आदित्यनाथ यांनी यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. राज्याच्या शिक्षण क्षेत्रात योगदान देण्याचे आवाहन केले. मात्र, आता पूर्ण भरती प्रक्रियेलाच स्थगिती मिळाली आहे.