महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'भाजपकडून संविधानाच्या मुळ गाभ्यावर हल्ला' - citizenship amendment bill

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे.

प्रियंका गांधी
प्रियंका गांधी

By

Published : Dec 12, 2019, 3:19 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. नागरिकत्व विधेयक लागू करून भाजप संविधानाच्या मुळ गाभ्यावर हल्ला करत आहे. भाजपच्या या भेदभावाच्या उद्देश्या विरुद्ध काँग्रेस लढत राहील, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.

एकीकडे भारतीय जनता पक्षाने महात्मा गांधींच्या जयंतीला 150 वर्षे पूर्ण होत असल्याचा उत्सव साजरा केला. तर दुसरीकडे नागरिकत्व राज्यघटनेच्या विरुद्ध असलेले भेदभाव करणारे विधेयक आणले आहे. भेदभावाच्या या हेतूविरुद्ध काँग्रेस मजबूतपणे लढत राहील, असे प्रियंका गांधी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. लोकसभेनंतर बुधवारी राज्यसभेमध्येदेखील १२५ विरूद्ध १०५ अशा फरकाने हे विधेयक मंजूर करण्यात आले. विधेयकाविरोधात ईशान्य भारतामधील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असून आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर त्रिपुरामध्ये लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. तसेच गुवाहाटीमध्ये लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details