महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गुढीपाडव्याच्या दिवशी प्रियांका गांधींच्या ट्विटमध्ये 'ही' चूक - twit

काँग्रेसच्या उत्तरप्रदेश पूर्वच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी काश्मीरच्या लोकांना या दिवशी शुभेच्छा दिल्या. मात्र, शुभेच्छा देताना त्यांच्याकडून 'नवरेह' ऐवजी 'नवरोज' अशी गफलत झाली. 'नवरोज' हा पारशी समुदायाचा सण आहे. तर नवरेह हा काश्मिरी लोकांचा सण आहे.

प्रियांका गांधी

By

Published : Apr 6, 2019, 9:48 PM IST

नवी दिल्ली - महाराष्ट्र आणि गोवा येथे गुढीपाडवा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तसेच, देशात विविध ठिकाणी विविध सण साजरे केले जातात. या दिवशी उत्तर भारतात नवरात्री, दक्षिण भारतात उगादी, असे विविध सण साजरे होतात. तर, जम्मू-काश्मीरमध्ये आजच्या दिवशी 'नवरेह' सण साजरा केला जातो.

काँग्रेसच्या उत्तरप्रदेश पूर्वच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी काश्मीरच्या लोकांना या दिवशी शुभेच्छा दिल्या. मात्र, शुभेच्छा देताना त्यांच्याकडून 'नवरेह' ऐवजी 'नवरोज' अशी गफलत झाली. 'नवरोज' हा पारशी समुदायाचा सण आहे. तर नवरेह हा काश्मिरी लोकांचा सण आहे. त्यात नवरोज एका महिन्यापूर्वीच साजरा झाला आहे. तेव्हा याच्या शुभेच्छा काश्मीरी लोकांना देण्याची चूक प्रियांका गांधी यांच्याकडून झाली आहे.

प्रियांका गांधी यांनी ट्विट केले की, माझ्या काश्मिरी बंधू आणि भगिनींना 'नवरोज'च्या शुभेच्छा. 'काल मला रोड शोमुळे पंचपक्वान्नांची थाळी बनवायला वेळ मिळाला नाही. जेव्हा मी रोड शोनंतर घरी आले, तेव्हा डायनिंग टेबलवर माझी थाळी आधीच तयार होती. आई किती प्रेमळ असते,' असे ट्विट प्रियांका गांधींनी केले आहे.यानंतर प्रियांका गांधी यांच्या ट्विटवर काहींनी 'नवरोज'च्या शुभेच्छा दिल्या. तर, काहींनी त्यांना 'नवरोज' हा पारशी लोकांचा सण असून, काश्मीरमध्ये 'नवरेह' साजरा केला जातो, असे सांगितले. लेखक तारेक फतेह यांनी ट्विट करत प्रियंका गांधी यांना सांगितले की, 'नवरोज' हा सण मागील महिन्यात साजरा केला गेला आहे. काश्मीरमध्ये नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी जो सण साजरा केला जातो त्याला 'नवरेह' म्हटले जाते.
पारशी लोक पारशी नववर्षाच्या पहिल्या दिवशी 'नवरोज' साजरा करतात. यादिवशी नवीन कपडे, मिठाई एकमेकांना दिली जाते. तर, 'नवरेह' हा काश्मीरमधील हिंदू पंडितांचा सण आहे. हा नववर्षाच्या पहिल्या दिवशी काश्मीरमध्ये साजरा केला जातो.

ABOUT THE AUTHOR

...view details