नवी दिल्ली - काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या श्रमीक कामगारांना परत आण्यासाठी राजस्थानमधून 500 बसेसची व्यवस्था केली. तसेच एक हजार बसेस चालवण्याची मागणी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केली आहे. गांधी यांनी राज्य सरकारला याबाबतचे पत्र दिले आहे आणि तत्काळ मंजुरी देण्याची मागणी केली आहे.
प्रियांका गांधी करणार मजुरांसाठी बसेसची सोय; 1 हजार बसेस चालवण्याचा उत्तर प्रदेश सरकारकडे प्रस्ताव - migrant workers news
काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी एक हजार बसेस चालवण्याची मागणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केली आहे. गांधी यांनी राज्य सरकारला याबाबतचे पत्र दिले आहे आणि तत्काळ मंजुरी देण्याची मागणी केली आहे.
लॉकडाऊन काळात ६५ कामगारांनी अपघातामध्ये आपले प्राण गमवाले आहेत. राष्ट्र उभारणीमध्ये महत्वाचं योगदान देणाऱ्या कामगारांप्रती जबाबदारी म्हणून गाझिपूर आणि नोएडा परिसरातून दररोज ५०० बस चालवण्याची काँग्रेस पक्षाची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटलं. यासाठीचा सर्व खर्च काँग्रेस पक्ष करेल. मजूरांना आपल्या घरी आणण्यासाठी १ हजार बस गाड्या चालवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी पत्रामध्ये केली आहे.
यापूर्वी मजुरांना युपीएसआरटीसीच्या बसेसने घरी पोहोचवण्याची मागणी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली होती. तसेच लघु-उद्योग तसेच मध्यम स्तरावरील उद्योग व्यवसाय करणारे व्यापारी, आंगणवाडी सेविका, शेतकरी, मजूर, करारावर काम करणारे कामगार यासारख्या लोकांसाठी काही सवलती देण्याची मागणी केली होती.