नवी दिल्ली -पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधी या योग्य व्यक्ती आहेत, असे मत व्यक्त केले.
'प्रियंका गांधी या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी योग्य व्यक्ती आहेत. अध्यक्षपदासाठी कोण योग्य याचा निर्णय घेण्याची जबाबदारी काँग्रेस कार्यकारी समितीवर आहे. राहुल गांधी यांची जागा घेण्यासाठी प्रियंका या योग्य आहेत. यासाठी त्यांना पक्षाचा ही पाठींबा मिळेल', असे मत अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केले आहे.