नवी दिल्ली - नागरिकात सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूसह देशातील अनेक राज्यांत निदर्शने होत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या काही भागांमध्ये इंटरनेटसह व्हाईस कॉल आणि एसएमएस सेवाही बंद करण्यात आली आहे. त्यावरून प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आंदोलकांचा जितका आवाज दाबाल तितका आवाज मोठा होत जाईल, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
'आंदोलकाचा आवाज जितका दाबाल तितकाच तो मोठा होत जाईल', प्रियंका गांधींचे टि्वट - Priyanka Gandhi Vadra
प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आंदोलकांचा आवाज जितका दाबाल तितका आवाज मोठा होत जाईल, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
मेट्रो स्टेशन बंद आहेत. इंटरनेट बंद आहे. प्रत्येक ठिकाणी कलम 144 लागू आहे. जे लोक नागरिकांनी भरलेल्या कराचा पैसा खर्च करून जाहिरात करत होते, तेच लोक आज इतके सैरभैर झाले आहेत की, सर्वांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आंदोलकांचा जितका आवाज दाबाल तितका आवाज मोठा होत जाईल, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -'देशातील मुस्लिमांनी कॉंग्रेसच्या भूलथापांना बळी पडू नये'
दिल्लीतील लाल किल्ला भागात संचारबंदी लागू असतानाही मोठ्या प्रमाणात आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. तर दिल्ली शेजारच्या राज्यातील नागिरक दिल्लीकडे येत असल्याची माहिती गृहमंत्रालयाला मिळाली आहे. त्यानुसार सीमेवर सुरक्षा व्यवस्था बाळगण्यात येत आहे. दिल्लीमधील 15 मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली होती.