महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'भाजप सरकार प्रचार करण्यात सुपरहीरो मात्र, कामात सुपर सुपरझिरो', प्रियंका गांधींचा हल्लाबोल - congress leader priyanka gandhi in jharkhand

पाकुर येथे काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. भाजप सरकार प्रचार करण्यात सुपरहीरो मात्र कामात सुपरझिरो असल्याची टीका त्यांनी केली.

प्रियंका गांधी
प्रियंका गांधी

By

Published : Dec 18, 2019, 6:09 PM IST

नवी दिल्ली - झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकांचा प्रचार अखेरच्या टप्प्यामध्ये आहे. पाकुर येथे काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहेत की, विभाजनाचे असा सवाल त्यांनी सभेत उपस्थित केला. तसेच भाजप सरकार प्रचार करण्यात सुपरहीरो मात्र कामात सुपरझिरो असल्याची टीका त्यांनी केली.

झारखंडमधील ही अस्तित्वाची निवडणूक आहे. ज्या कायद्यासाठी अदिवासी लढले. तोच कायदा भाजपने मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप आदिवासी लोकांची जमीन, जंगल हिसकावून आपल्या श्रीमंत मित्रांना देत आहे. उत्तर प्रदेशमध्ये अदिवासी लोकांना मारहाण केली. मी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. तर मला अडवले, असे प्रियंका गांधी सभेत म्हणाल्या.

हेही वाचा -CAA protest: हरियाणातील नूह जिल्ह्यात आंदोलन, २ हजार पोलीस सुरक्षेसाठी तैनात


प्रचारामध्ये भाजप सुपरहिरो आहे. मात्र वास्तवामध्ये काम सुपर झीरो आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये भाजपने राज्यातील किती लोकांना रोजगार दिला, असा प्रश्न त्यांनी सभेत उपस्थित केला. झारखंडमध्ये लोक भुकेने मरत आहेत. देशामध्ये महागाई वाढली असून सरकार देशातील सार्वजनिक कंपन्या विकत आहे. देशामध्ये महिलांवर अत्याचार होत असून भाजप सरकार देशातील समस्या सोडण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा -'निर्भया' प्रकरणातील दोषीची पुनर्विचार याचिका फेटाळली, राष्ट्रपतींकडे करणार दयेचा अर्ज

राज्यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या तीन पक्षांनी निवडणूकपूर्व युती जाहीर केली आहे. त्यानुसार काँग्रेस ३१, राजद 7, तर जेएमएम सर्वाच जास्त ४३ जागा लढवेल. या युतीकडून मुख्यमंत्रीपदासाठी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे नाव पुढे केले जात आहे. झारखंडमध्ये सध्या मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार आहे.


२०१४ साली झारखंड विधानसभा निवडणुका ५ टप्प्यांमध्ये पार पडल्या होत्या. त्यावेळी २ कोटी ५२ हजार ८०८ अधिकृत मतदार होते. त्यापैकी १ कोटी ३८ लाख ५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details