महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शेख हसीना यांनी प्रियंका गांधीची घेतली गळाभेट; ट्विटरवर शेअर केले छायाचित्र - पंतप्रधान मनमोहन सिंग

बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत दौऱ्यावर आहेत. शेख हसीना यांनी आज (रविवार) माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि हंगामी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे.

शेख हसिना यांनी प्रियंका गांधीची घेतली गळाभेट

By

Published : Oct 6, 2019, 7:18 PM IST

नवी दिल्ली -बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत दौऱ्यावर आहेत. शेख हसीना यांनी आज (रविवार) माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि हंगामी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीचे प्रियंका गांधी यांनी आपल्या टि्वटरवर छायाचित्र शेअर केले आहे.

शेख हसिना यांनीमनमोहन सिंग आणि हंगामी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली
प्रियंका गांधी यांनी शेख हसीना यांची गळाभेट घेतनाचे छायाचित्र टि्वट केले आहे. हे छायाचित्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 'आज शेख हसीना यांची भेट घेतली. गेल्या कित्येक दिवसांपासून मी त्यांची वाट पाहत होते. त्यांची वाईट परिस्थितीशी लढण्याची शक्ती, त्यांचे विचार आणि त्यांचा संघर्ष मला नेहमीच प्रेरणा देतो', असे प्रियंका गांधी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
शेख हसीना ह्या सर्वांत जास्त काळ बांग्लादेशाच्या पंतप्रधान राहिल्या आहेत. यावर्षी त्यांनी लगातार तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते. तेव्हा मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी सोबत हसिना यांचे घट्ट संबध होते.

ABOUT THE AUTHOR

...view details