महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधानांच्या मतदारसंघात विणकाम कारागिरांची दैना...प्रियंका गांधींचा मोदींवर हल्ला - Varanasi weavers plight

लॉकडाऊनमुळे विणकरांचे काम थांबले आहे. लहान कारागीर आणि व्यावसायिकांची स्थिती खूप वाईट आहे. सरकारचे प्रचारतंत्र नाही तर मजबूत आर्थिक मदत त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढेल, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

प्रियंका गांधी
प्रियंका गांधी

By

Published : Jul 1, 2020, 3:20 PM IST

नवी दिल्ली -वाराणसीतील विणकाम कामगारांच्या बिकट परिस्थितीवरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघातील विणकरांची लॉकडाऊनमुळे बिकट अवस्था झाली आहे. त्याच्यासाठी सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी प्रियंका गांधींनी केली.

विणकाम करणाऱ्या कामगारांना घर आणि दागिने गहाण ठेवून जगण्याची वेळ आली आहे. योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींबरोबर एक कार्यक्रम आयोजित केला. मध्यम आणि लघू उद्योगांत लाखो लोकांना रोजगार दिल्याचा दावा या कार्यक्रमात केला. मात्र, खरी परिस्थिती अशी आहे की, मोदींच्या वाराणसी मतदार संघातील विणकाम करणाऱ्या कामगारांना दागिने आणि घर गहाण ठेवून जीवन जगावे लागत आहे, असे गांधी म्हणाल्या.

लॉकडाऊनमुळे विणकरांचे काम थांबले आहे. लहान कारागीर आणि व्यावसायिकांची स्थिती खूप बिकट आहे. सरकारचे प्रचारतंत्र नाही तर मजबूत आर्थिक मदत त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढेल, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

26 जूनला मोदींनी आत्मनिर्भर उत्तरप्रदेश अभियान सुरु केले. या अभियानामुळे रोजगार गमावलेल्या 1 कोटी 25 लाख स्थलांतरीत मजुरांना फायदा होईल, असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details