नवी दिल्ली -जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती 30 टक्क्यांनी घसरल्या आहेत. त्यावरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ' जागतिक स्तरावर तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. मात्र, भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ केली जात आहे', असे ट्विट प्रियांका गांधी यांनी केले आहे.
'कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याचा फायदा सर्वसामान्यांना का मिळत नाही?' - प्रियांका गांधींची भाजपवर टीका
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधाला आहे. ' जागतिक स्तरावर तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. मात्र, भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ केली जात आहे', असे ट्विट प्रियांका गांधी यांनी केले आहे.
'जगभरात कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत. पण भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याचा फायदा सर्वसामान्यांना का मिळत नाही?', असा सवाल त्यांनी टि्वट करून उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी दिल्ली-मुंबईमध्ये पेट्रोल 36 रुपयांना विकण्याचा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांवर टीका केली आहे.
सौदी अरेबिया आणि रशियामधील दर युद्धामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये विक्रमी घसरण झाली आहे. जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर कमी होत असताना केंद्र सरकारने प्रति लिटर पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क करामध्ये तीन रुपयांची वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी घसरण झाली असली तरी त्याचा फायदा म्हणावा तसा भारतीय ग्राहकांना झालेला नाही. उलट आता करात वाढ केल्यामुळे पेट्रोल-डिझेल आणखी महागणार आहे.