नवी दिल्ली - सर्व प्रमुख वाहिन्यांवरती दाखवण्यात येणाऱ्या एक्झिट पोल्समध्ये भाजप-प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळणार असल्याचे अंदाज लावण्यात आले आहेत. यानंतर काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी सोमवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना 'एक्झिट पोल्स आणि अफवांकडे लक्ष देऊ नये, असा सल्ला दिला आहे. एक्झिट पोल्समधून जाहीर करण्यात आलेल्या निकालांमुळे चिंता करत न बसता मतमोजणी केंद्रावर नजर ठेवावी,' असे प्रियांका यांनी म्हटले आहे.
कार्यकर्त्यांनी एक्झिट पोलच्या निकालांकडे लक्ष देऊ नये, मतमोजणी केंद्रावर नजर ठेवावी - प्रियांका गांधी - party workers
'एक्झिट पोल्स आणि अफवांकडे लक्ष देऊ नये, असा सल्ला दिला आहे. एक्झिट पोल्समधून जाहीर करण्यात आलेल्या निकालांमुळे चिंता करत न बसता मतमोजणी केंद्रावर नजर ठेवावी,' असे प्रियांका यांनी म्हटले आहे.
प्रियांका गांधींनी याविषयी एक ऑडियो संदेश जारी केला आहे. 'अफवांवर आणि एग्झिट पोलवर विश्वास ठेवून हिंमत हरू नका. या अफवा तुमचे मनोबल खच्ची करण्यासाठीच पसरवल्या जात आहेत. अशा वेळेस सावध राहणे अधिकच आवश्यक ठरते. स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्रांवर नजर ठेवा आणि सावध रहा,' असे त्यांनी या ऑडिओमध्ये म्हटले आहे. 'आमच्या आणि तुमच्या मेहनतीला यश मिळणार, अशी आम्हाला आशा आहे,' असे त्या पुढे म्हणाल्या.
१९ मे रोजी जाहीर झालेल्या सर्व प्रमुख एग्झिट पोल्समध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.