नवी दिल्ली -काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी शिमल्याला जाणार नसल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली आहे. हिमाचलमध्ये जाण्यासाठी आवश्यक असणारी परवानगी त्यांच्या मुलांनी आणि अन्य कार्यालयीन अधिकाऱ्यांनी मागितल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रियंका गांधी यांच्या कार्यालयाने माध्यमांमध्ये चालणाऱ्या वृत्ताचे खंडन केले असून कागदपत्रांमधील नावांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रियंका गांधी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह काही आठवड्यांसाठी राष्ट्रपती रिट्रीटजवळील शिमल्याच्या घरी जाणार असल्याचे वृत्त होते. यासाठी त्यांनी सरकारची परवानगी मागितल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली. या वृत्तावर प्रियंका गांधीच्या कार्यालयाने स्पष्टीकरण दिले आहे.
जुलै महिन्यात प्रियंका गांधी यांनी नवी दिल्लीतील लोधी इस्टेट येथील निवासस्थान सोडले होते. यावेळी केंद्र सरकारतर्फे त्यांची सुरक्षा देखील कमी करण्यात आली होती.
प्रियंका गांधी सध्या कॉंग्रेसच्या उत्तर प्रदेश प्रभारी आहेत; आणि त्या प्रदेश कॉंग्रेससाठी राजकीय रोडमॅप तयार करण्यात व्यग्र असल्याचे त्यांच्या कार्यालयाने सांगितले आहे.