लखनऊ : काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये नवरीत सिंह यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. नवरीत सिंह यांचा शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत प्रियांका म्हणाल्या, की नवरीत हे देशासाठी हुतात्मा झाले. ते २५ वर्षांचे होते, माझा मुलगा २० वर्षांचा आहे त्यामुळे या कुटुंबीयांच्या भावना मी समजू शकते.
शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणे गुन्हा..
प्रियांका गांधी म्हणाल्या की सरकारने शेतकऱ्यांशी या कायद्यांबाबत चर्चा करायला हवी. मात्र, तसे होत नाही. गुरु गोविंद सिंग म्हणाले होते, की अत्याचार करणे पाप आहे, आणि अत्याचार सहन करणेही पाप आहे. सरकार सध्या कृषी कायदे मागे न घेता, शेतकऱ्यांनाच दहशतवादी म्हणत आहे. सरकारला या आंदोलनामध्येही राजकारण दिसत आहे, हे अत्यंत चुकीचे आहे असे त्या म्हणाल्या.
प्रियांका गांधींनी घेतली नवरीत सिंह यांच्या कुटुंबीयांची भेट; म्हणाल्या त्यांचे हौतात्म्य वाया जाणार नाही.. शेतकरी आंदोलन म्हणजे राजकीय आंदोलन नव्हे..
गांधी म्हणाल्या, की देशभरात सुरू असलेले शेतकरी आंदोलन हे कोणतेही राजकीय आंदोलन नसून सामान्य शेतकऱ्यांचा रोष आहे. मी या (नवरीत सिंह यांच्या) कुटुंबीयांना सांगू इच्छिते, की तुम्ही या लढाईत एकटे नाही. संपूर्ण देशातील शेतकरी तुमच्या सोबत उभे आहेत. नवरीत यांचे हौतात्म्य आम्ही वाया जाऊ देणार नाही. या आंदोलनामागे कोणताही राजकीय पक्ष नसून, हे लोकांसाठी लोकांनी सुरू केलेले आंदोलन आहे, असेही त्या म्हणाल्या.
प्रियांका गांधींनी घेतली नवरीत सिंह यांच्या कुटुंबीयांची भेट; म्हणाल्या त्यांचे हौतात्म्य वाया जाणार नाही.. पंतप्रधानांना बराच अहंकार..
शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलन करत असूनही पंतप्रधान त्यांना भेटत नाहीत. दिल्लीमध्येच पंतप्रधान निवास असूनही मोदी शेतकऱ्यांना भेटण्यास नकार देतात, कारण त्यांच्यामध्ये अहंकार आहे. आपल्या अहंकारामुळेच ते घरातून आंदोलनस्थळापर्यंतही जात नाहीयेत, असे म्हणत गांधींनी मोदींवर निशाणा साधला.
हेही वाचा :मिशन आत्मनिर्भर! तेजस लढाऊ विमानांसह लष्करी सामुग्रीच्या निर्यातीस मंजुरी