नवी दिल्ली - केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांच्यावर बसपच्या सर्वेसर्वा मायावती आणि काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी टीका केली आहे. 'आपल्याकडे नोकऱ्या आहेत मात्र, उत्तर भारतात त्यासाठी योग्य उमेदवारांची कमतरता आहे.' या गंगवार यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
हेही वाचा -आंध्र प्रदेशात ६१ पर्यटकांना घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीत बुडाली, मृतांचा आकडा ११ वर
काँग्रेस, बसपसह इतर विरोधी पक्षांनी हा उत्तर भारतीयांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. मंत्री महोदय, ५ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून तुमचे सरकार आहे, नोकऱ्या निर्माण झालेल्या नाहीत, जे काही रोजगार होते, ते चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आलेल्या मंदीत जात आहेत. तरुण वर्ग आस लावून बसला आहे की, सरकार काहीतरी चांगले करेल. मात्र, तुम्ही तर उत्तर भारतीयांचा अपमान करत आहात, हे लोक तुम्हाला सोडणार नाहीत, असे प्रियांका गांधींनी ट्विटवरून म्हटले आहे.
हेही वाचा -पाकिस्तानकडून वर्षभरात २०५० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताने व्यक्त केली चिंता
मायावती यांनी गंगवार यांच्यावर टीका करताना त्यांनी या वक्तव्यावर देशाची माफी मागावी, असे म्हटले आहे. त्या म्हणाल्या, देशात आलेल्या भीषण मंदी आणि इतर समस्यांविषयी मंत्री हास्यास्पद वक्तव्ये करत सुटले आहेत. देशातील विशेषत: उत्तर भारतातील बेरोजगारी दूर करण्याऐवजी त्यांना असे म्हणायचे आहे की, नोकऱ्यांची कमतरता नसून योग्य उमेदवारांची कमतरता आहे. हे खूपच अपमानास्पद आहे, मंत्र्यांनी याविषयी देशाची माफी मागायला हवी.
काय म्हणाले, श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार -