नवी दिल्ली -उत्तर प्रदेशमध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधातील आंदोलनात हिंसा केल्याप्रकरणी 200 पेक्षा अधिक लोकांना अटक केली आहे. त्यामध्ये महिला काँग्रेस कार्यकर्त्या सदफ जफर यांचाही समावेश आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी टि्वट करत सदफ जफर यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून उत्तर प्रदेश सरकारने अमानुषतेच्या सर्व सीमा पार केल्या आहेत, असे म्हटले.
शनिवारी उत्तर प्रदेश पोलिसांवर प्रियांका गांधी यांनी खळबळजनक आरोप केला होता. पोलीस निरीक्षक एस.आर. दारापुरी यांची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांनी आम्हाला अडवले. महिला पोलिसाने माझा गळा पकडत गैरवर्तन केले. मात्र, माझा निश्चय अटळ असून आंदोलनामध्ये पोलिसांच्या दडपशाहीला बळी पडलेल्या प्रत्येक नागरिकासोबत मी उभी आहे. भाजप भ्याड कृत्य करीत आहे. मी उत्तर प्रदेशची प्रभारी असून आणि मी उत्तर प्रदेशात कुठे जाईन, याचा निर्णय भाजप सरकार घेणार नाही, अशी प्रियांका गांधी यांनी फेसबुक पोस्ट केली होती.
हेही वाचा -केवळ 'भारत माता की जय' म्हणणारेच भारतात राहू शकतात; केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य