महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वादा तेरा वादा...! जीडीपी घसरण मुद्द्यांवरून प्रियांका गांधीचा मोदींवर हल्लाबोल - priyanka gandhi hit out modi

देशाच्या जीडीपीमध्ये ४.५ पर्यंत घसरली असून तो गेल्या सहा वर्षातल्या सर्वांत निचांकी पातळीवर गेला आहे.

प्रियंका
प्रियंका

By

Published : Nov 30, 2019, 4:39 PM IST

नवी दिल्ली -देशाच्या जीडीपीमध्ये ४.५ पर्यंत घसरली असून तो गेल्या सहा वर्षातल्या सर्वांत निचांकी पातळीवर गेला आहे. जीडीपी दरात झालेल्या घसरणीबद्दल गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.


प्रगती करण्याची इच्छा असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेला मोदी सरकारने खिळखिळे करून सोडले आहे. प्रत्येक वर्षी 2 कोटी रोजगार, पिकांना दुप्पट भाव, मेक इन इंडिया, 5 ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था ही सर्व आश्वासन खोटी ठरली आहेत. असे प्रियंका गांधी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.


नव्याने जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न ४.५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. रिजर्व बँक ऑफ इंडियाने २०१९-२० साली जीडीपी ६.१ टक्क्यांवर राहणार असल्याचे भाकित केले होते. त्याआधी विकास दर ६.९ टक्के राहणार असल्याचे सर्वोच्च बँकेने म्हटले होते. मात्र, नंतर आकडेवारीत बदल केला होता. आता विकास दर ४.५ टक्क्यांवर आल्याने सर्वांना धक्का बसला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details