महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

स्थलांतरित मजुरांना घरी जाण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने बस उपलब्ध करून द्याव्यात - प्रियांका गांधी - Priyanka Gandhi's request to Yogi Adityanath

देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या कामगारांनी पायी घराची वाट धरली आहे. या मजुरांना युपीएसआरटीसीच्या बसेसने घरी पोहचवण्याची मागणी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली.

Priyanka Gandhi
Priyanka Gandhi

By

Published : May 14, 2020, 11:09 AM IST

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या कामगारांनी पायी घराची वाट धरली आहे. या मजुरांना युपीएसआरटीसीच्या बसेसने घरी पोहचवण्याची मागणी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली.

भुकेल्या-तहानलेल्या अवस्थेमध्ये हजारोच्या संख्येने मजूर पाय चालत आहेत. यामध्ये लहान मुले, गर्भवती महिला आहेत. यूपीएसआरटीसीच्या बसेस राज्य सरकारकडे उपल्बध आहेत. या बसेसच्या माध्यमातून मजुरांना त्याच्या घरी पोहचवा, असे प्रियांका गांधींनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

सर्व मजुरांना बसेसने त्यांच्या घरी सोडल्यास त्यांची स्क्रीनिंग आणि चाचणीही करता येईल. तसेच गरजेनुसार क्वारंटाईनही करता येईल. लाखोच्या संख्येने लोक चाचणी न करता, टँम्पो, ट्रक, सायकल आणि पायी चालत आपल्या गावी जात आहेत. हे सर्वांसाठी धोकादायक आहे, असेही त्या म्हणाल्या.

यापूर्वीही प्रियांका गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहिलं होते. या पत्राच्या माध्यमातून प्रियंका यांनी लघु-उद्योग तसेच मध्यम स्तरावरील उद्योग व्यवसाय करणारे व्यापारी, आंगणवाडी सेविका, शेतकरी, मजूर, करारावर काम करणारे कामगार यासारख्या लोकांसाठी काही सवलती देण्याची मागणी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details