नवी दिल्ली - आठ पोलिसांच्या हत्येस जबाबदार असलेल्या कुख्यात गुंड विकास दुबेवरील खटल्याची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केली आहे. कानपूरमध्ये पोलीस विकास दुबेला अटक करण्यास गेले असता त्याने साथीदारांसह पोलिसांवर गोळीबार केला होता. यामध्ये आठ पोलीस मारले गेले तर सात जण जखमी झाले. दुबेला मध्यप्रदेशातील उज्जैन येथून अटक करण्यात आली आहे.
‘विकास दुबे आणि सत्ताधाऱ्यांमधील संबध उघडे पाडण्यासाठी या प्रकरणाची सीबीआय चौकशी गरजेची आहे. कानपूरमधील पोलिसांच्या क्रुर हत्येनंतर ज्या पद्धीतीने पोलिसांनी हालचाल केली त्यातून सरकारचे अपयश दिसून येते. पोलिसांनी ’हायअलर्ट' दिला असतानाही विकास दुबे उज्जैनला पोहचला. त्यातून सुरक्षा यंत्रणांचा हलगर्जीपणा दिसून येतो'.