नवी दिल्ली -काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद हे गांधी घराणे सोडून पक्षातील इतर नेत्यांना देण्यात यावे, असे मत माजी अध्यक्ष राहुल गांधींनी व्यक्त केले आहे. या त्यांच्या मताला काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव प्रियांका गांधी यांनी पाठिंबा दिला आहे. त्या म्हणाल्या, की मागील निवडणुकीनंतर राहुल यांनी राजीनामा देताना स्पष्टपणे सांगितले आहे की, यापुढे शक्यतो गांधी घराणे सोडून पक्षातील इतर नेत्यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात यावे. या त्यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे.
हर्ष शाह आणि प्रदिप चिब्बर यांनी लिहिलेले इंडिया टूमारो : कॉन्व्हर्साशन विथ द नेक्स्ट जनरेशन ऑफ पॉलिटीकल लिडर्स पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यात दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.