लखनऊ -उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत असून पीडित तरुणीचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेबद्दल गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष असतानाही त्यांच्या विरोधाला न जुमानता पोलिसांनी पीडितेच्या पार्थिवावर घाईगडबडीत अंत्यसंस्कार केले. याप्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी संताप व्यक्त केला असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
'रात्री 2.30 वाजता कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेवर अंत्यसंस्कार केले. ती जिवंत होती. तेव्हा सरकारने तिला सुरक्षा दिली नाही. अधिकार हिसकावून घेतला आणि तिला सन्मानही दिला नाही. घोर अमानुषता, गुन्हेगारी थांबवली नाही. तर गुन्हेगारांसारखा व्यवहार केला. राज्यात न्याय नाही, तर फक्त अन्यायाचा बोलबाला आहे, असे टि्वट प्रियांका गांधी यांनी केले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.