नवी दिल्ली - काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी देशात महिलांविरोधात वाढत्या अत्याचारावरून पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. उन्नावमध्ये मागील ११ महिन्यात तब्बल ९० बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. सरकारला निर्णय घ्यावा लागेल, ते गुन्हेगारांच्या बाजूनं आहे की, महिलांच्या बाजूनं, असे म्हणत प्रियांका गांधीनी ढासळत्या कायदा सुव्यवस्थेवरून सरकारला लक्ष्य केले.
हेही वाचा -पोलिसांवर हल्ला केल्यानं आरोपींना गोळ्या घातल्या, हैदराबाद पोलिसांची पत्रकार परिषद
कायदा सुव्यवस्था राखणं हे सरकाचं काम आहे, असे म्हणत त्यांनी महिलांविरोधात वाढत्या अत्याचारांवरून चिंता व्यक्त केली. उन्नाव पीडितेला जिवंत जाळल्यानंतर प्रियांका गांधींनी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारवर काल (गुरुवारी) टीका केली होती. आज पुन्हा त्यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवला आहे.
हेही वाचा -जलदगती न्यायालयांची उदासीनता...
रायबरेली न्यायालयात जात असताना उन्नाव बलात्कार पीडितेला आरोपींनी रॉकेल टाकून पेटवून दिले. यामध्ये पीडिता ९० टक्के भाजली आहे. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयामध्ये पीडितेवर उपचार सुरू आहेत. सध्या पीडिता मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.