नवी दिल्ली -उत्तर प्रदेशमधील हापूर येथील पोलीस कोठडीमध्ये एका युवकाचा मृत्यू झाला आहे. त्यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला. हापूरमध्ये एका शेतकऱ्यांच्या मुलाला पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला आहे. तर त्याच्या लहान मुलाला खायला देऊन गप्प राहण्यास सांगितल्याचा प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार खुपच लाजिरवाणा असल्याचे सांगत प्रियांका गांधी यांनी टि्वटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये युवकाचा पोलीस कोठडीत मृत्यू , प्रियंका गांधी यांचा भाजपवर हल्लाबोल
उत्तर प्रदेशमधील हापूर पोलीस कोठडीमध्ये युवकाचा मृत्यू झाला आहे. त्यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला
भाजप सरकार वाढती गुन्हेगारी थांबवण्यामध्ये पुर्णपणे अपयशी ठरले आहे. तर पोलिसांकडून नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना रोज घडत आहेत, असे प्रियंका यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
हापूरमधील पिलखुवा भागात दोन महिन्यापूर्वी एका महिलेची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी एका युवकाला अटक केली होती. त्या युवकाचा गेल्या रविवारी कोठडीत मृत्यू झाला. पोलिसांनी त्या युवकावर थर्ड डिग्री चार्ज केल्याची माहिती आहे. याप्रकरणी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाकडून उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांना नोटीस जारी करण्यात आले आहे.