उत्तर प्रदेश- सोनभद्र हत्याकांडातील पीडितांची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना पोलिसांनी रस्त्यातच रोखले होते. त्यानंतर नारायणपूर येथे धरणे धरलेल्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी चुनार गेस्ट हाऊसमध्ये हलवले होते. मात्र, पीडितांच्या भेट घेतल्याशिवाय माघारी जाणार नसल्याचा पवित्रा प्रियंका यांनी घेतला आहे. तसेच संचारबंदीचे उल्लंघन केले नसल्याचेही त्यांनी सांगितले आणि जामीन घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. या दरम्यान प्रियंका गांधींनी ईटिव्ही भारतला विशेष मुलाखत दिली आहे.
दरम्यान उत्तरप्रदेश सरकार माझ्यावर दबाव आणत असून सोनभद्र हत्याकांडातील पीडितांची भेट न घता परत जा. असे सांगत असल्याचा आरोप प्रिंयका गांधी यांनी केला आहे.
सर्व रात्र मेणबत्तीत घालवू पण आमचा निषेध सुरूच ठेवू.
"चुनार गेस्ट हाऊसमध्ये प्रशासनकडून रात्री वीज कापण्यात आली होती . जेणेकरून प्रियंका गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास होऊन ते या ठिकाणाहून निघून जातील. पण आम्ही सर्व रात्र मेणबत्तीत घालवू पण आमचा निषेध सुरूच ठेवू." असे प्रियंका यांनी सांगितले.
मला का थांबवले आहे हे मला माहित नाही
प्रियंका गांधी या गेल्या शक्रवारी रात्रीपासून चूनार अतिथी घरात रहात आहेत. "मला का थांबवले आहे हे मला माहित नाही? आधी सांगण्यात आले होते की, सोनभद्रमध्ये जमावबंदी आहे. मात्र मला त्या अलिकडेच अटक करण्यात आली आहे. मागील काही तासांपासून मी इथेच आहे." असे प्रियंका यांनी सांगितले. तसेच प्रियंका गांधी यांना पूढील कार्यक्रम बाबत विचारले असता त्यांनी, " मी आमच्या कार्यकर्त्यांसोबत सकाळ पासून इथेच आहे. आज(शुक्रवारी रात्रीही आम्ही इथेच राहणार आहोत. मी सकाळी परत जाण्यासाठी एक कार्यक्रम तयार करीत आहे. तो पर्यंत कार्यकर्त्यांसोबत संघटन आणी पक्षीय कामकाजाची चर्चा करत आहेत." असे त्यांनी सांगितले.