महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सोनभद्र हत्याकांडातील पीडितांना भेटायला जाणाऱ्या प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात - priyanka gandhi

वाराणसी वरुन सोनभद्रला जात असताना मिर्जापूर जवळील नारायणपूर येथे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलीस मला कोठे घेवून जात आहेत, माहित नाही. मात्र, मी कोठेही जाण्यास तयार असल्याचे प्रियांका गांधीनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

प्रियांका गांधी

By

Published : Jul 19, 2019, 1:09 PM IST

Updated : Jul 19, 2019, 1:18 PM IST

वाराणसी- सोनभद्र हत्याकांडातील पीडितांना भेटण्यास निघालेल्या उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटनीस प्रियांका गांधीना मिर्झापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्याकांडानंतर घटनास्थळी कलम १४४ लागू असल्याचे कारण देत पोलिसांनी ही कारवाई केली. सोनभद्रला जाण्यास अडविल्यानंतर प्रियांका गांधी आणि कार्यकर्ते धरणे आंदोलनाला बसले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

प्रियांका गांधीना मिर्जापूर पोलिसांनी ताब्यात घेतले

वाराणसी वरुन सोनभद्रला जात असताना मिर्जापूर जवळील नारायणपूर येथे पोलिसांनी त्यांना कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतले. या आधी वाराणसीमध्ये गांधीनी रुग्णालयात जखमींची आणि पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पोलीस मला कोठे घेवून जात आहेत, माहीत नाही. मात्र, मी कोठेही जाण्यास तयार असल्याचे प्रियांका गांधीनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जमिनीच्या वादातून राज्यातील सोनभद्रमध्ये मंगळवारी १० जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हिंसाचारात १९ जण जखमीही झाले आहेत. मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था राहीली नसल्याचे म्हणत विरोधकांनी सरकारला घेरले आहे.

भाजपाच्या राज्यात गुन्हेगारांना धाक राहिलेला नाही. खुलेआम हत्या करण्यात येत आहेत. सोनभद्रच्या उम्भा गावात माफियांनी १० जणांना ठार केले आहे. आदिवासी बांधवांची हत्या करण्यात आली. ही अत्यंत निषेधार्ह घटना आहे, असे प्रियंका गांधीनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Last Updated : Jul 19, 2019, 1:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details